• salgaramruttulya0207@gmail.com
  • + ९१-९०२१३३२५७०
best tea franchise opportunities in maharashtra

सलगर अमृततुल्य चहा

प्रसन्न सकाळी वर्तमानपत्र वाचताना आपली सोबत करणारा, जुने मित्र एकत्र आल्यावर अगदी आपसूकच आणि न ठरवता फिक्स असलेला, काम करून थकलेल्या जिवाला एक स्पेशल रिचार्ज देणारा, नव्या लोकांशी ओळख आणि आपुलकी वाढवणारा आपणा सर्वांचा प्रिय चहा...!

बर्‍याच गोष्टींमध्ये आपली चहा बद्दलची चाहत दिसून येते. कडक उन्हाळा असो वा गोड गुलाबी थंडी, चहा तर हवाच. आरोग्यासाठी हानिकारक नसलेला व उत्तम दर्जाचा चहा मिळाला तर किती बरं होईल असा विचार सगळ्यांच्याच मनात येतो आणि यावरच पर्याय म्हणजे अस्सल दर्जेदार सलगर अमृततुल्य चहा. कोणत्याही गोष्टीचा आनंद असो वा कसलीही चिंता चहा पिण्याला सर्वांचे प्राधान्य असते आणि म्हणूनच हा चहा ताजा आणि उत्कृष्ट चवीचा हवा. हे सर्व गुण आहेत आपल्या सलगर चहामध्ये म्हणूनच आज हा चहा अनेकांच्या जीभेवर राज्य करणारा ठरला आहे.

अनेकांच्या पसंत असणार्‍या आणि अस्सल चवीच्या सलगर अमृततुल्य चहाचा प्रवास देखील त्याच्या चवीप्रमाणेच कडक आणि रोमांचकारक आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे शेतकरी कुटुंबातील दादू सलगर यांच्या यशाचा प्रवास हा अत्यंत स्वप्नवत वाटतो. मिळेल ते काम करत एका रसवंतीगृहापासून सात रसवंतीगृह आणि मग चहाप्रेमींच्या ओठांवरचे नाव असलेला "सलगर अमृततुल्य चहा" हा खडतर मार्ग धाडसाने पार करणार्‍या दादू सलगर यांनी अल्पावधीतच मोठा नावलौकिक मिळवला.


आपल्या व्यवसायाच्या बाबतीत दूरदृष्टी ठेवली तर ते व्यवसाय वृद्धीसाठी महत्वपूर्ण ठरते. दादू सलगर यांच्या या आधुनिक विचारांमुळे आज सलगर चहा यशाचे शिखर गाठताना दिसतो. दूरदृष्टी आणि सतत नाविन्याच्या शोध याच्या जोरावर फक्त पारंपारिक चहा बनवण्यावर समाधान न मानता त्यामध्येही बदलता वयोगट व जीवनपद्धती यांचा अभ्यास करून पुढचे पाऊल उचलले गेले. 'सलगर अमृततुल्य चहा'वर निरतिशय असं प्रेम करणाऱ्या तरूण मुला-मुलींच्या आवडीचा असा ठंडा ठंडा कूल कूल Ice Tea सुद्धा उपलब्ध आहे.
सलगर अमृततुल्य चहा आता महाराष्ट्र आणि कर्नाटकासह संपूर्ण भारतभर आपले पंख पसरण्यास सज्ज आहे.

best tea shop in maharashtra

दृष्टीकोण

भारतातील सर्वात आवडता आणि नावाजलेला चहा-कॉफी शॉप म्हणून नावारूपाला येण्याकरिता कार्यरत.

ध्येय

आमचे ध्येय सुरक्षितता, नावीन्य, मूल्य आणि सेवा यांच्यासह उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने आमच्या ग्राहकांपर्यंत पोचविणे आहे. आम्ही अभिमानाने ग्राहकांना सेवा देतो आणि सलगर अमृततुल्य चहा हा ब्रँड वचनपूर्तीच्या उत्कटतेने कार्य करतो.