• salgaramruttulya0207@gmail.com
  • + ९१-९०२१३३२५७०

सलगर अमृततुल्यच का आहे अनेकांची पहिली पसंत...?

काही दिवसांतच सलगर चहाच्या अवीट चवीने अनेकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक क्षणी आपली उमेद वाढवणार्‍या सलगर अमृततुल्य चहाची प्रत्येक शाखेमध्ये एकसारखी चव राखलेली आहे. हा चहा शुद्ध व भेसळमुक्त दुधापासून तयार केला जातो. उत्तम दर्जा असणारी चहापावडर व रसायनविरहित मसाले, साखर वापरुन बनवलेला हा चहा आरोग्यास हानीकारक नाही. या सर्व बाबींमुळे कमी कालावधीत सलगर अमृततुल्यने अनेक चहाप्रेमींच्या मनावर राज्य करत आहे.

चहा तयार करताना त्याची चव जपणे जितके महत्वाचे असते, तितकेच महत्वाचे असते तिथे स्वच्छता राखणे. स्वच्छ व नीटनेटक्या ठिकाणी खाण्या-पिण्याला सर्वांचे प्राधान्य असते. ग्राहकांचे आरोग्य जपले जावे म्हणून सलगर अमृततुल्य चहा तयार करताना वापरली जाणारी सर्व भांडी स्वच्छ असावी याची पुरेपूर काळजी घेतली जाते, तसेच इतर सर्व गोष्टींमध्ये देखील स्वच्छता राखली जाते. यामुळेच सलगर अमृततुल्य चहा अनेकांना प्यारा आहे.

best tea business opportunities in maharashtra
ग्राहकांना उत्तम सर्व्हिसेस देता याव्यात यासाठी सलगर अमृततुल्यची टिम नेहमीच प्रयत्नशील असते. ग्राहकांनी दिलेल्या सूचना व काही कल्पनांचा स्वीकार करून त्यांच्या इच्छेप्रमाणे बदल करत गेल्याने चहाची गुणवत्ता राखणे शक्य झाले. चवीला उत्तम असणारा सलगर अमृततुल्य चहा आपल्या शरीराला बाधा पोहोचवत नाही तसेच त्याच्या अस्सल चवीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

सर्वांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद आणि दर्जा कायम ठेवण्याच्या जिद्दीमुळे सलगर अमृततुल्यच आहे अनेकांची पहिली पसंत. तुम्ही देखील तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या व सलगर चहाची अवीट चव नक्की चाखा.